--> टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी | पुढाकार24 समाचार

टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी

टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावल्याने शेतकरी चिंतातुर , शासनाकडे मदतीची मागणी...


टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी


शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावल्याने शेतकरी चिंतातुर , शासनाकडे मदतीची मागणी


कन्हान : - पारशिवनी तहसील अंतर्गत टेकाडी शिवारातील टेकाडी - बोरडा पांधन रस्त्या लगतच्या गव्हाच्या शेतात अचानक आग लागली . आगीत जवळपास शंभर एकरातील उभे गव्हाचे पीक जळुन राख रांगोळी झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला . काबडकष्ट केलेल्या शेतकऱ्यांचा तोंडचा घास आगीने हिसकावल्याने  परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदतीची मागणी शासनाकडे केली आहे . 


शेतकऱ्यांनी सांगितले की , सोमवार (दि.२३) मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान शैलेश सातपैसे हे रतन आणि गणेश कांबळे यांची १३ एकर शेती ठेक्याने केलेल्या शेतातील उभ्या गव्हाच्या पीकाला अचानक आग लागली . वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले आणि शेजारील शेतांमध्ये झपाट्याने पसरली . रतन कांबळे, गणेश कांबळे (१३ एकर) , कमलाकर राऊत (२ एकर) , श्यामराव मरघडे (२.५ एकर) , गुलाब राउत (५ एकर) , नामदेव कांबळे (१.५ एकर) , संदीप राऊत (५ एकर) , रामभाऊ राऊत (२ एकर) , शकुंनबाई सावरकर (२ एकर) , उत्तम सातपैसे (६ एकर) , रामराव सातपैसे (१.५ एकर) , येणेकर (१२.५ एकर) यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक आगीत जळाले . या घटनेत आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत जवळपास शंभर एकरातील उभे गव्हाचे पिक जळुन राख रांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले . शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकाविल्याने परिवाराच्या उदनिर्वाकरिता शेतकरी चिंतातुर झाला आहे . शेतकऱ्यांनी आपल्या परिने आग विझविण्याचा पर्यंत केला . परंतु तो पर्यंत गव्हाचे पीक जळुन नष्ट झाले .


घटनेची माहिती अग्निशामक विभागाला मिळताच नगरपरिषद कन्हान-पिपरी , कामठी , नगरपंचायत कांद्री, महादुला येथील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाले . मोठ्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले . त्यामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांचे पीक वाचले . घटनास्थळी कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , सपोनि रोशन बावनकर , रोशन देवतळे , सम्राट वनप्रती सह पोलीस कर्मचाऱ्यांनी पोहचुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले . तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे . 


आगीने झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरकार , शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी बोरडा ग्रामपंचायत उपसरपंच नरेंद्र ठाकरे , भगवानदास यादव , राजु गुडधे , हरिश भेलावे , शैलेश सातपैसे , रामकृष्ण हुड , विशाधर कांबळे , क्रिष्णा कांबळे , टेकाडी , बोरडा सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .

Wheat Crop Reduced to Ashes as Fire Erupts in Tekadi Farmlands

सह संपादक - ऋषभ बावनकर

COMMENTS

नाम

१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिन,2,६ दिसम्बर,1,आरोग्य,12,आस्था,8,कन्हान,70,कामठी,28,क्राई,3,खेलकुद,2,गोंडगांव,2,गोंडेगांव,3,चंद्रपूर,1,टेकड़ी खदान,11,ठाणे,3,दक्षिण भारत,1,देश/विदेश,14,नागपूर,114,पारशिवनी,49,बिरस मुंडा जयंती,2,ब्रम्हपुरी,1,भारत,4,मनसर,4,महाराष्ट्र,17,महिला,3,मानवंदना,2,मुंबई,4,राजनीती,2,रामटेक,14,विदर्भ,7,विनम्र अभिवादन,5,सावनेर,1,crime,14,krushi,4,Nanded,3,
ltr
item
पुढाकार24 समाचार: टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी
टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गव्हाच्या पीकाची राख रांगोळी
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh2dCykt0CG0FUOcFL5CKy0HIAJkChXMHZOC678gVMqHj8b4N44wY4JBAewKhB63Z7nfza0H_bPpS3d4dZP5b92icsUqVJcgLM2dooBCivNigwdxnCCv1pygR-zwQqh_G9A_MKtQsGciu2SHoB-mBOAG-xN7Am1uG_i-21HXQ0sGB-DXlhsvCdXjKjfoMU=s16000
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh2dCykt0CG0FUOcFL5CKy0HIAJkChXMHZOC678gVMqHj8b4N44wY4JBAewKhB63Z7nfza0H_bPpS3d4dZP5b92icsUqVJcgLM2dooBCivNigwdxnCCv1pygR-zwQqh_G9A_MKtQsGciu2SHoB-mBOAG-xN7Am1uG_i-21HXQ0sGB-DXlhsvCdXjKjfoMU=s72-c
पुढाकार24 समाचार
https://www.pudhakar24.com/2026/03/Wheat-Crop-Reduced-to-Ashes-as-Fire-Erupts-in-Tekadi-Farmlands.html
https://www.pudhakar24.com/
https://www.pudhakar24.com/
https://www.pudhakar24.com/2026/03/Wheat-Crop-Reduced-to-Ashes-as-Fire-Erupts-in-Tekadi-Farmlands.html
true
8376227616141695999
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content