मुरबाड कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकरी यांनी केले भऺजनाचे आयोजन | Farmers organized a dinner at Murbad Agriculture Officer's office
मुरबाड कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकरी यांनी केले भऺजनाचे आयोजन | Farmers organized a dinner at Murbad Agriculture Officer's office
मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्धता करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील लोक संख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे पावसाळ्यात शेतीत होणाऱ्या भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मुरबाड तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडी नंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकानदार कडून कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्याच प्रमाणे खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खतांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे.
तरी खंतपुरवठा करणाऱ्या दुकानदारांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले आहे.या आंदोलन मध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव उपतालुकाप्रमुख राजेश भांगे रमेश घोलप विनायक ढमणे विलास शिंदे अशोक मांडे भाऊ यशवंतराव रामचंद्र सासे निलेश भरत गायकर चोधरी पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी मिलिंद घरत नरेश देसले बबलु ब्हाडकर विठ्ठल देशमुख दिनेश खापरे सुधाकर घुडे तानाजी खापरे अमोल मलिक अमोल गगे चिंतामण गायकर गोपाळ धाणके व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश भांगे मुरबाड
COMMENTS