व्हाईस आफ मिडीया पारशिवनी तालुका पत्रकार संघाची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली
पारशिवनी :- येथिल तकीया देवस्थान येथे दिनांक ३१/७/२०२५ ला कार्य शाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक श्री.मा. दिलीप जी घोडमारे नागपूर जिल्हा अध्यक्ष व्हाईस आफ मिडीया, प्रमुख पाहुणे श्री.मा. संजयजी टेंभेकर नागपुर जिल्हा सदस्य, राहुल जी सावजी सावनेर तालुका अध्यक्ष, राजु जी कापसे रामटेक तालुका अध्यक्ष, पुरुषोत्तम जी नागपुरे तसेच सतीश साकोरे पारशिवनी तालुका कोषाध्यक्ष हे मंचावर उपस्थित होते.
त्या नंतर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संचालन पारशिवनी तालुका अध्यक्ष कल्याण जी अडकने यांनी केले तसेच सर्व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले कल्याण अंडकने,पुनादास गजभिये आणि आलेल्या सर्व पाहुण्यांनी पत्रकारिता कशी करायची व त्यापासून होणारे फायदे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला रामटेक, सावनेर,खापा आणि पारशिवनी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दशरथ आकरे, पुनादास गजभिये, सुनील डोमकी, नरेंद्र भिमटे, प्रशांत सावरकर, सतीश साकोरे, कल्याण अंडकने आकाश वाढरेआणि रविंद्र वाकोडे यांनी सहकार्य केले .
पारशिवनी प्रतिनिधी, सतीश साकोरे, दशरथ आकरे, पुनादास गजभिये

COMMENTS