कार ट्रॅक्टरवर आदळून एक ठार,तर दोघे गंभीर जखमी माळाकोळी: हिराबोरी पाटी नजीक घटना माळाकोळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असल...
माळाकोळी: हिराबोरी पाटी नजीक घटना
माळाकोळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिराबोरी पाटी जवळ नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर कार ट्रॅक्टरवर आदळून एक जण जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना (शुक्रवार) रात्री अकरा वाजता घडली असून कार मधील सर्व ज माळाकोळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथील कर्मचारी आहेत .
अधिक माहिती अशी की माळाकोळी महाराष्ट्र ग्रामीण बँक येथील कर्मचारी बँकेचे पीक कर्जाचे काम आटपून जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते ते घरी परतत असताना हिराबोरी पार्टी ता. लोहा येथे ट्रॅक्टरवर पाठीमागून कार क्रमांक एम एच 24 ए एफ 6617 क्रमांक नसलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरदार धडकून प्रशिक सुनील बागडे (रोखपाल) वय 34 वर्षे
रा. कन्हान-नागपूर याचा जागीच मृत्यू झाला असून अभिजीत ढोके (लेखापाल), शेख शादुल (सहाय्यक) हे दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत तर आशिष सर हे किरकोळ जखमी झाले आहेत.
कार ट्रॅक्टर वर जोरात धडकल्याने कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला पाऊस असल्याने अडथळा येत असला तरी माळाकोळी पोलीस कर्मचारी व अन्य नागरिकांनी मदत करून जखमींना तात्काळ नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.
गंभीर जखमींना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असून मृतक व्यक्तीवर माळाकोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, राठोड सर, विनोद भुरे हे करीत आहेत.
प्रतिनिधि: प्रशांत पवित्रे , मुखेड - नांदेड़
COMMENTS