कांशीराम यांनी वैयक्तिक स्वार्था ऐवजी समाजासाठी काम केले , कांशीराम सारख्या महापुरुषांची नितांत गरज - कैप्टन सतीश बेलसरे
कांशीराम यांनी वैयक्तिक स्वार्था ऐवजी समाजासाठी काम केले , कांशीराम सारख्या महापुरुषांची नितांत गरज - कैप्टन सतीश बेलसरे
कन्हान : - कन्हान युथ फाउंडेशन चे कैप्टन सतीश बेलसरे यांनी कांशीराम यांच्या पुण्यतिथि सोहळ्यात त्यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कांशीराम यांनी वैयक्तिक स्वार्था ऐवजी समाजासाठी काम केले , कांशीराम सारख्या महापुरुषांची नितांत गरज देशाला असल्याचे कैप्टन सतीश बेलसरे यांनी संबोधनातुन सांगितले .
गुरुवार (दि.९) आॅक्टोंबर रोजी कन्हान युथ फाउंडेशन द्वारे आंबेडकर चौक कन्हान येथे कांशीराम यांच्या पुण्यतिथि निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कैप्टन सतीश बेलसरे यांनी कांशीराम यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले .
यावेळी कैप्टन सतीश बेलसरे यांनी कांशीराम यांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले , त्यांनी आपल्या संबोधनात कांशीराम हे शोषित समाजाच्या सुप्त राजकीय जाणीवेला जागृत करणारे पहिले व्यक्ती होते . बाबासाहेबांनी संविधानाद्वारे शोषित समाजासाठी विकासाचे दरवाजे उघडले , परंतु आदरणीय कांशीराम यांनीच त्यांना विकासाच्या या दरवाज्याबाहेर नेले . बाबा साहेबांनी दलितांना मनोबल निर्माण करण्याचे आवाहन केले , तर कांशीरामांनी समाजाला मनोबल निर्माण करण्यास भाग पाडले . कांशीराम हे अशा महापुरुषांपैकी एक आहेत ज्यांनी वैयक्तिक स्वार्थाऐवजी समाजासाठी काम केले . त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रात, आदरणीय कांशीराम यांनी शोषित समाजाला त्यांचे कुटुंब म्हणून वर्णन केले . आज समाजाला कांशीराम सारख्या महापुरुषांची नितांत गरज आहे . असे सांगितले .
कार्यक्रमात उपस्थित सर्व समाज बांधवांनी व नागरिकांनी कांशीराम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन पाळुन श्रद्धांजलि अर्पित केली . या प्रसंगी कन्हान युथ फाउंडेशन चे कैप्टन सतीश बेलसरे , देविदास तडस , गणेश भालेकर , राॅबीन निकोसे , केतन भिवगडे , अजय चव्हाण , कमलेश शर्मा , चिराल वैद्य , राजेश फुलझले , महेश डोंगडे , नेवालाल पात्रे अमित मोटघरे सह आदि नागरिक उपस्थित होते .
Kanshiram worked for the society instead of personal interests, great men like Kanshiram are desperately needed - Captain Satish Belsare
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

COMMENTS