Ambulance used by Zilla Parishad for goods transport
राजेश भांगे ठाणे
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ठाणे जिल्हा परिषदेला दान केलेल्या ॲब्युलन्सचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याने आरोग्य विभागाचे कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे जिल्ह्याचा बहुतेक भाग हा पुणे , नाशिक रायगड तसेच जव्हार,पालघर जिल्ह्याचे सरहद्दीवर असल्याने दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना शहापुर मध्ये घडल्या असल्याने भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी नुकत्याच आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची घटना ताजी असताना ग्रामीण भागातील गर्भवती महिला,तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना व सर्पदंश झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुंबई मेट्रो सर्कल ने एम.एच.०४ के.यु.०४७८ हि अँब्युलन्स ठाणे जिल्हा परिषदेला दान दिलेली असताना ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हि अँब्युलन्स रुग्णांना तातडीचे उपचार देण्यासाठी वापरत नसुन ती चक्क माल वाहतुकीसाठी वापरली जात असुन बुधवारी ३.३० चे सुमारास ती अँब्युलन्स मुरबाड ग्रामीण रुग्णालयात सायरन वाजवत माल घेऊन आल्याने या अँब्युलन्स मध्ये बाहेरील अपघाताचा पेशंट आला असावा असे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांना वाटले.
परंतु त्या अँब्युलन्स मध्ये चक्क साहित्य असल्याने आरोग्य विभागा कडून स्टेट बॅंकेने दान केलेल्या रुग्ण वाहिकेचा माल वाहतुकीसाठी गैरवापर होत असल्याची चर्चा करत संताप व्यक्त केला.
!! आमच्या कडे असणाऱ्या वाहनाचा रुग्णा साठीच वापर करावा हि सक्ती नाही. काही ठिकाणी औषधे पुरवठा करण्यासाठी रुग्णवाहिकेचा आम्ही वापर करु शकतो - डॉ.गंगाधर परगे.जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.
!! सदरची रुग्ण वाहिका ठाणे जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्याने तिचा वापर कशासाठी करावा.याचे भान त्यांनी ठेवावे.डाॅ.अशोक नांदापुरकर .उप संचालक आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे.
राजेश भांगे-ठाणे

COMMENTS