कन्हान येथे ११ जानेवारी रोजी महारक्तदान शिबीर |The administration committed an injustice by demolishing 80 shops under the pretext of illegal encroach
कन्हान : - जीवनदान महाकुंभ - २०२६ अंतर्गत महारक्तदान शिबीराचे रामानंदाचार्य संप्रदाय कन्हान सेवा केंद्रा व्दारे रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आयोजन करण्यात आले आहे . शिबीर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे .
रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गमवावे लागतात हि गरज लक्षात घेऊन समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी तसेच गरजु रुग्णांना मोफत वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या प्रेरणादायी संदेशाखाली नागरिकांना रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे . या रक्तदान शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात येणार असून सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध असतील .
कन्हान शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी व युवकांनी तसेच सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे . जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिजधाम (महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविला जात आहे , मानवी सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे .
The administration committed an injustice by demolishing 80 shops under the pretext of illegal encroachment.
सह संपादक - ऋषभ बावनकर

COMMENTS