मासोळी विक्री करिता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून द्या - रोशन फुलझेले |Provide a separate fish market place for selling fish - Roshan Phul
मासोळी विक्री करिता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून द्या. - रोशन फुलझेले
Provide a separate fish marketplace for selling fish - Roshan Phulzele
#) कन्हान - पिपरी नगर परिषद मुख्याधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन
कन्हान : - महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने कन्हान-पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत यांना भेटुन निवेदन देऊन मासोळी विक्रेता करिता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे .
कन्हान, पिपरी येथील भोई, ढिवर हे कित्येक वर्षापासुन कन्हान नदीतील मासोळया पकडुन कन्हान शहरात विक्री करून आपल्या परिवाराचा उदरंनिवाह करतात . आज पर्यंत यांना मासोळी विक्री करिता मासोळी बाजाराची स्वतंत्र जागा नसल्याने हे पिपरी रोड व कानपुर केमिकल च्या जागेवर मासोळी विक्रीचा व्यवसाय करित असल्याने या पिपरी मार्गावर येणाऱ्या जाणायाची वर्दळ असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होऊन रोज वाहतुक खोळबुन भाडंण , हाणामारी होत असुन येथील मासोळी विक्रेत्याना भयंकर त्रस्त सहन करित असल्याने त्याना मासोळी विक्री करिता मासोळी बाजाराची स्वतंत्र जागा तात्काळ उपलब्ध करून समस्येचे त्वरित निवारण करून मासोळी विक्रेते व खरेदी करण्या-या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे . अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात
शिष्टमंडळाने कन्हान - पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी रविंद्र राऊत याना भेटुन व निवेदन देऊन करण्यात आली आहे .
या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष विक्की नांदुरकर , माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र पांडे , विभागीय अध्यक्ष राहुल घाटे , प्रदीप मनगटे , धनराज ढेंगळे , शिवनारायण सिंग , विनोद वाघधरे , विशाल थूटे , निखिल सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
मासोळी विक्री करिता स्वतंत्र मासोळी बाजाराची जागा उपलब्ध करून द्या - रोशन फुलझेले |Provide a separate fish market place for selling fish - Roshan Phulzele
COMMENTS